ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 20 - नाशिकहुन उत्तराखंडमध्ये गेलेले 222 भाविक सुखरूप व सुरक्षित असल्याची माहिती नाशिकमधील चौधरी यात्रा आणि श्रीराम यात्रा व केसरी टुर्स कंपनीकडून देण्यात आली आहे.
उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ मार्गावर विष्णुप्रयाग येथे शुक्रवारी (दि.१९) भूस्खलन झाल्याने 15 हजार भाविक अडकले होते. त्यात सुमारे 222 भाविक नाशिकहून गेलेले आहेत. चारधाम यात्रेला सुरुवात झाल्याने उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे. मात्र भूस्खलन झाल्याने हजारो भाविक अडकल्याने अडकले आहेत.
चामोली जिल्ह्यातील जोशीमठ भागापासून 9 किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. यासोबतच हृषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील 60 मीटर भागाचे भूस्खलनामुळे नुकसान झाले आहे. सुदैवानं या घटनेत भाविकांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
बीडमधील 7 जण अडकलेत
बीडमधील अंबाजोगाई व परळी तालुक्यातील सात जण बद्रीनाथ येथे झालेल्या भूस्खलन दुर्घटनेमुळे अडकले आहेत. या सात जणांपर्यंत अद्याप कोणतीही प्रशासकीय मदत पोहोचली नसल्याची माहिती मिळत आहे.
अंबाजोगाई येथील उतरेश्वर बनाळे यांच्या खासगी वाहनात सतीश शेप(शेपवाडी), दामोदर तांदळे, उत्तम तांदळे(सरडगाव), दिनकर चव्हाण(वडखेल), सिताराम रेवले, रमेश तिवार(परळी) हे सर्वजण शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या नंतर बद्रीनाथपासून ४०कि. मी. अंतरावर असलेल्या जोशीमठ येथे अडकून पडले आहेत. भूस्खलन झाल्याने येथील वाहतूक ठप्प आहे.
https://www.dailymotion.com/video/x844zag