ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 5 - गांधीनगर येथील लढाऊ सैन्य वैमानिक प्रशिक्षण केंद्रातून 27 वैमानिकांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. लेफ्टनंट जनरल ब्रिगेडियर रेमोन नरोन्हा यांनी सर्व वैमानिकांना एव्हिअशन विंग प्रदान करून भविष्यातील कारर्किदीसाठी शुभेच्छा दिल्या. कॅप्टन आकाश अवस्थी हे अष्टपैलू कामगिरी करणारे वैमानिक ठरले आहेत.
त्यांना सिल्व्हर चित्ता स्मृतीचिन्ह देऊन सन्मानितदेखील करण्यात आले. यानंतर युद्धजन्य परिस्थिती कशी हाताळावी याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. दरम्यान, गांधीनगरमधील लढाऊ सैन्य वैमानिक प्रशिक्षण केंद्रामधील गेल्या अनेक वर्षांपासूनची 'रुद्र' हेलिकॉप्टरची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
'रुद्र' लढाऊ हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्रात लवकरच दाखल होणार असल्याची माहिती लेफ्टनंट जनरल ब्रिगेडियर रेमोन नरोन्हा 'लोकमत'सोबत संवाद साधताना दिली आहे. 'रुद्र हेलिकॉप्टरबाबत वरिष्ठ स्तरावर बोलणे सुरू असून, गांधींनगरच्या केंद्रात असलेल्या हेलिकॉप्टरच्या ताफ्यात 'रुद्र'चा समावेश असेल. सध्या चित्ता, चेतक, धुर्व हेलिकॉप्टरवरच प्रशिक्षण सुरू आहे', अशी माहिती त्यांनी दिली आहे.
https://www.dailymotion.com/video/x844gya