ऑनलाइन लोकमत
वसई, दि. २२ - गेल्या तीन दिवसांपासून सतत कोसळणा-या पावसामुळे वसई पूर्वेकडील मिठागर पाड्यातील संपूर्ण वस्ती पाण्याखाली गेली आहे. १२५ घरात पाणी शिरले असून सुमारे ४०० जण अडकले आहेत.
वसई विरार च्या अग्निशमन विभागाने सकाळी 10.30 च्या सुमारास बोटीच्या साहय्याने २५ जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याले आहे. पाऊस थांबल्याने पाणी ओसरू लागल्याने परिस्थिती आटोक्यात आली आहे.
वसई - वालीव सातिवली रोड साई रेसिडेंसी हॉटेल जवळ, काल रात्री उशिरा राजकुमार गौतम वय( 30 वर्ष रा.वालीव फाटा) हा तरूणरस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे गटारात पडून वाहून गेला. वसई विरार अग्निशमन विभागाचे कर्मचारी मृतदेहाचा शोध घेत आहे.
दरम्यान वसई...वैतरणा परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले असून स्टेशनला येण्याजाण्या साठीच्या मुख्य रस्त्यावर पाणी भरल्यामुळे कसराळी ,जांबुल पाडा, दहिसर,मोदल पाडा डोलीव,खार्डी ,कोशिंबे तसेच इतर गावातील लोकांना वैतरणा स्टेशनवर येण्याजाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. नागरिक अडकून पडले आहेत.