बीड : परळी तालुक्यातील दाऊतपुर येथील राख बंधाऱ्यात रविवारी दुपारी राखेच्या ढिगाऱ्यावर अडकलेली पोकलेन मशीन क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढत असताना झाला अपघात. वजन अनियंत्रित झाल्याने क्रेनसह पोकलेन मशीन उंचावरून जमीनीवर आदळली. यामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेत सुदैवाने कोणासही इजा झाली नाही. क्रेन चालकाचे दैव बलवत्तर म्हणायची वेळ आली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
दोन दिवसापूर्वीच पांगरी येथे राख वाहन चालकांना महिलेने चप्पलने चोप दिल्याचा व्हायरल झाला होता. प्रकार ताजा असताना रविवारी क्रेन व पोकलेन मशीन उंचावरून खाली आदळल्याचा व्हिडीओ वायरल झाला. हा प्रकार परळीजवळील राख बंधारा परिसरातील असल्याचे सांगण्यात येते आहे. परळी तालुक्यातील दाऊतपुर येथील राख तळ्यात दररोज २०० गाडी भरून राख घेऊन जात आहेत.