विशाल हळदे, ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १२ - ठाण्यात चंदनवाडी दत्तमंदिराजवळ रहाणारे नारायण थिटे यांनी टोयोटा कंपनीच्या सर्व्हीस सेंटरमध्ये बिलाची रक्कम चिल्लरमध्ये चुकवली. पाचशे आणि १ हजार रुपयाच्या नोटा स्वीकारायला नकार देणा-या टोयोटा सर्व्हीस सेंटरच्या कर्मचा-यांना तिटे यांनी ४२६७ रुपयांची चिल्लर मोजायला लावली.
नारायण थिटे यांच्या मालकीची टोयोटा क्वालिस गाडी आहे. ते शुक्रवारी गाडीचे स्पेअर पाटर्स आणण्यासाठी वागळे इस्टेट येथील टोयोटाच्या सेंटरमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी गाडीचे काही स्पेअर पार्टस विकत घेतले. त्याचे बिल ४२६७ रुपये झाले. तिटे यांनी ५०० आणि १ हजारच्या नोटा पुढे करताच कर्मचा-यांनी नोटा घेण्यास नकार दिला.
त्यानंतर तिटे घरी गेले त्यांनी बिलाच्या रक्कमेची चिल्लर गोळा केली आणि शनिवारी पुन्हा टोयोटाच्या सेंटरमध्ये गेले. त्यावेळी स्पेअर पार्टसचे बिल चुकवण्यासाठी त्यांनी चिल्लरची थैली दिली. सर्व्हीस सेंटरच्या कर्मचा-यांनी आधी नकारघंटा वाजवली. पण चिल्लर कायदेशीर पैसा असल्याचे खडसावताच कर्मचा-यांनी चिल्लरमधले बिल स्वीकारले.
फोटो - विशाल हळदे
https://www.dailymotion.com/video/x844hpi