ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ९ - गेल्या चार वर्षा पासुन वन्यजीवांच्या रक्षणासाठी वेगळे वेगळे सामाजिक उपक्रम राबवणा-या अमॅच्युअर कल्ब फाऊंडेशनने या वर्षी गणेश उत्सवाच्या निमित्ताने टाकाऊ प्लास्टिकच्या बॉटल पासुन बर्ड फीडर गणेशा साकारला आहे, चिमणी हा पक्षी आता जगण्यासोबतच स्व:ताच्या अस्तित्वासाठी लढत आहेत.
आधुनिकीकरणामुळे चिमण्यांची घरटे आता लाप पावत आहेत. चिमण्यांसाठी कोणी दाणेही टाकत नाहीत त्यामुळे अशा स्थितीत त्यांना चिमण्याच संपण्याची वेळ येऊ शकते. पर्यावरणामधील जीवसृष्टीचा हा धोका स्पष्ट करण्यासाठी अमॅच्युअर कल्ब फाऊंडेशने बर्ड फिडर गणेशा तयार करून नागरीकांसमोर प्रभावी पणे मांडला आहे.