ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 6 - पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठीचा नारळ भाजपाने अखेर फोडला आहे. प्रचाराचा शुभारंभ करण्यापूर्वी सिंहगडावर भाजपाच्या सर्व उमेदवारांना पारदर्शक कारभाराची शपथ देण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, शहराध्यक्ष गोगेश गोगावले उपस्थित होते.
पारदर्शक कारभाराच्या मुद्द्यावर शिवसेनेला घेरतानाच मराठीचाही मुद्दा जवळ करण्याचे धोरण भाजपाने स्वीकारले आहे.
रविवारी मुंबईतही भाजपाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित मेळाव्यात पक्षाच्या सर्व उमेदवारांना पारदर्शकतेची शपथ घ्यायला लावली.
‘मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपाचा डाव आहे,’ असा आरोप शिवसेना आणि मनसेकडून होत आहे. हा आरोप खोडून काढत मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने हुतात्मा स्मारकापासूनच आपल्या प्रचाराला सुरुवात केली.
https://www.dailymotion.com/video/x844qhz