ऑनलाइन लोकमतसातारा, दि. २६ - आई आणि आजीसोबत रानात गेलेला सहा वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना माण तालुक्यातील विरळी गावात आज दुपारी घडली. बोअरवेलमध्ये पडलेल्या या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे. विरळी ता.माण येथील मंगेश अनिल जाधव हा सहा वर्षांचा मुलगा आई व आजी सोबत रानात गेला होता. दुपारी 3:30च्या डाळिंब खाण्यासाठी तो शेजारच्या संतोष नलवडे यांच्या शेतात गेला. त्यावेळी त्या शेतात असलेल्या बोअरवेलमध्ये तो पडला. ही बोअरवेल 500 फूट खोल आहे. मंगेश हा 25फुटावर क्लिपमध्ये अडकला असून, तो आतून ओरडत असल्याचा आवाज येत आहे. घटना स्थळी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. बोअरवेल मध्ये बॅटरीने पाहिले असता त्याची हलचाल सुरू आहे. श्वास घेण्यास अडचण होऊ नये म्हणून ऑक्सिजन सोडण्यात आला आहे. प्रशासन व ग्रामस्थ त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
VIDEO : साताऱ्यात बोअरवेलमध्ये पडला मुलगा
By admin | Published: June 26, 2017 6:58 PM
ऑनलाइन लोकमत सातारा, दि. २६ - आई आणि आजीसोबत रानात गेलेला सहा वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना माण तालुक्यातील ...
https://www.dailymotion.com/video/x8456p0