ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 13 - वांद्र्यातल्या पूर्वेकडच्या बेहराम पाड्यात एक 5 मजल्यांची इमारत कोसळून आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगा-याखाली अडकलेल्या 5 जणांची सुटका करण्यात आली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. ढिगा-याखाली अडकलेल्यांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश होता. दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. घटनास्थळी पोलीस आणि एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार बिल्डिंग कोसळून ढिगा-याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी बचावकार्य थांबवलं आहे. घटनास्थळी बचावकार्यासाठी अग्निशामक दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या असून, एक अँब्युलन्सही पोहोचली होती.
वांद्र्यातला बेहराम पाडा हा अवैध बांधकामांसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या भागात महापालिकेनं 350 अवैध बांधकामे तोडण्याचे आदेश दिले होते. याआधी भिवंडीतही अशाच प्रकारे तीन मजल्यांची इमारत कोसळली होती. त्या दुर्घटनेत 23 लोक गंभीररीत्या जखमी झाले होते.
WATCH: 5-storey structure in Bandra East (Mumbai) collapses. 6-7 people feared trapped. Rescue op underway pic.twitter.com/MSfMiHgCTS— ANI (@ANI_news) October 13, 2016