ऑनलाइन लोकमत /सचिन गाभने
डोणगाव (बुलडाणा), दि. 16 - जवळा येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. १६ फेब्रुवारी रोजी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर ग्रामस्थांनी गर्दी केली असली तरी एकानेही मतदान केले नाही. गावात जाणारा रस्ता जोपर्यंत दुरूस्त होणार नाही, तोपर्यंत मतदान करणार नसल्याचा निर्णय गावक-यांनी घेतला आहे.
१६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदान गर्दी करीत आहे. मात्र, मेहकर तालुक्यातील जवळा गाववासियांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. जवळा गावात जायला असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गावात बस येत नाही. गावातील रूग्णांवर वेळेवर उपचार होत नाही.
अशा अनेक समस्यांचा सामना ग्रामस्थांना करावा लागतो. रस्ता दुरूस्तीची मागणी आतापर्यंत अनेकदा करण्यात आली. मात्र, त्यानंतरही रस्त्याची दुरूस्ती झाली नसल्यामुळे अखेरीस ग्रामस्थांनी बहिष्काराचा निर्णय घेतला.
https://www.dailymotion.com/video/x844r8w