ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ८ : औरंगाबाद शहरातील गजबजलेल्या पानदरीबा चौकातील शृगांर ब्युटी एम्पोरिअम या दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तीन बुरखाधारी महिलांनी हात की सफाई करीत मोठ्या शिताफीने २५ हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले. ४ जुलै रोजी घडलेली ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आता या कॅमेऱ्याच्या अधारे पोलीस त्या महिलांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी या तीन महिला दुकानात खरेदीच्या निमित्ताने घुसल्या. त्यावेळी दुकानात छोटी मुलगी बसलेली होती. बेन्टेक्सचे हे दागिने दाखव, ते दाखव असे म्हणत एका महिलेने तिला शोकेसमधील दागिने काढण्यात गुंतविले. त्याचवेळी संधी साधून सोबतच्या दोन बुरखाधारी महिलांनी मोठ्या शिताफीने एक एक करीत २५ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरी केले. नंतर किरकोळ खरेदी करीत या तिघी तेथून निघून गेल्या. या चोरी प्रकरणी सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.