ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 8 - मालेगाव तालुक्यातील इंग्रजकालीन ईमारतीचा स्वखचार्तून कायापालट केल्यानंतर आता परिसरात असलेल्या झाडांवर स्वखचार्तून पक्ष्यांसाठी जलपात्र ठेवून पक्ष्यांप्रती असलेले प्रेम शिरपूर येथील पोलीस स्टेशनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या कायार्चे सर्वत्र कौतूक होत आहे.शिरपूर पोलीस स्टेशन आवारात भव्य असे वृक्ष आहेत. या वृक्षांवर दरराजे शेकडो पशुपक्षी असतात. दिवसेंदिवस उन्हाळयाची वाढती दाहकता बघता शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरिष गवळी यांनी कर्मचाऱ्यांसमोर विचार व्यक्त केला. या कायार्ला कसलाही विचार न करता सर्वांनी होकार देवून वर्गणी करुन जेवढी झाडे त्यापेक्षा तिप्पट जलपात्रे विकत आणण्यात आलीत. एका झाडावर तीन ते चार जलपात्रे लावून त्यामध्ये दररोज वेगवेगळे कर्मचारी पाणी भरुन पक्ष्यांची तहान भागविण्यासचे कार्य करीत आहेत. विशेष म्हणजे पोलीस स्टेशन आवारात असलेल्या झाडांवर त जलपात्रे लटकविण्यात आलीच शिवाय प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरासमोरील झाडावरही हे जलपात्रे ठेवण्यात आली आहेत.
घरासमोरील जलपात्रांमध्ये पोलीस विभागाच्या कुटुंबातील सदस्य पाणी भरताहेत तर पोलीस स्टेशन आवारातील झाडांवरील जलपात्रात दररोज वेगवेगळे कर्मचारी आपले कर्तव्य समजून पाणी भरत आहेत. या कायार्साठी ठाणेदार हरिष गवळी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरिक्षक कमलेश खंडारे, पोलीस कॉन्स्टेबल नवलसिंह चरवंडे, अक्षय सोनुने, शरद राऊत यांच्यासह प्रत्येक कर्मचाऱ्याने सहकार्य केले.वाढते तापमान लक्ष घेता व झाडांवरील पक्ष्यांची किलबिलाट पाहून जलपात्र उभारण्याची कल्पना आली. ही कल्पना सहकार्यांसमोर मांडल्याबरोबर त्यांनी लगेचच जलपात्रे विकत आणली व झाडांवर लटकविलीत. तसेच त्यामध्ये पाणी भरण्याची जबाबदारी सुध्दा न सांगता वाटून घेतली. कर्मचाऱ्यांची तत्परता पाहून त्यांच्यामध्ये असलेल्या पक्षीप्रेमाचे मला सुध्दा कौतूक वाटले.- हरिष गवळी पोलीस निरिक्षक, शिरपूर जैन https://www.dailymotion.com/video/x844yqk