- विजय शिंदे / ऑनलाइन लोकमत
पोळयाच्या दूस-या दिवशी निघते बैलाची बंडीतुन मिरवणुक
आकोट, दि. 2 - आकोट तालुक्यातील उमरा या गावात 100 वषार्पुर्वींपासुन पोळ्याच्या दुस-या दिवशी व्दारका उत्सव साजरा करण्यात येतो. संत नरसिंग महाराज यांचे पावन स्पर्श असेल्या या गावात सर्व धर्म समभावने हा उत्सव पाहण्यासारखा असतो. या दिवशी बैलाची सजावट तसेच मखर बांधण्यात येतो. या बैलाला बंडीचा तयार केलेल्या रथामध्ये उभे करण्यात येते. हा रथ गावातील शेतकरी ओढुन आपली कृतज्ञता व्यक्त करतात.त्यानंतर वाकाजी महाराज मंदीरापासुन संपुर्ण गावातुन वाजत गाजत गावातुन मिरवणूक काढत येते. घरोघरी पुजा करीत बैलाचे दर्शन घेतात. गावात रांगोळी काढल्या जातात.या उत्सवात सर्व शेतकरी सहभागी होतात. व्दारका उत्सवाला सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात.नातेवाईक तसेच बाहेगावातील लोक हा उत्सव पाहण्याकरीता उत्सवात हिरारीने भाग घेतात.