ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - नजीक भविष्यात छतावरील सौरऊर्जेचा पर्याय स्वीकारावा लागेल. तो टाळता येणार नाही. प्रत्यक्षात सौरऊर्जा वापराचा हा पर्याय टाळता येणार नाही असे मत ‘क्लीनमॅक्स सोलार’चे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप जैन यांनी लोकमत ऊर्जा समिटमध्ये व्यक्त केले.
खासगी ग्राहक त्यांचे जे अर्थगणित आहे त्यावर रुफटॉप एनर्जीचा निर्णय घेतील. तुमची खासगी कंपनी असेल तर कंपनीच्या मालकावर तो निर्णय अवलंबून असेल. तंत्रज्ञान स्वीकारायला थोडा वेळ लागेल पण पुढच्या पाच-सातवर्षात रुफटॉप सोलार एनर्जीचा जास्तीत जास्त वापर सुरु झालेला असेल असे कुलदीप जैन यांनी सांगितले. इलेक्ट्रीसिटीच्या वापरामध्ये वाढ होणार आहे, त्यानुसार उत्पादन व वितरणाचे नियोजन करावे लागेल असे त्यांनी सांगितले.
दरम्यान सौरऊर्जेच्या क्षेत्रात उत्तम प्रकारे काम सुरु असून, या क्षेत्रात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.उत्पादनांच्या किंमती परवडू शकतील अशा पद्धतीने कमी होत आहेत, तंत्रज्ञानाचा वेगाने विकास होत असल्याने या क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत असे रवीन ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष विजय करिया यांनी सांगितले. सौरऊर्जेबरोबर पवन ऊर्जेकडे लक्ष द्यावे, सरकराने नियंत्रकाच्या भूमिकेऐवजी सुविधा पुरवण्याची भूमिका घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केली.
महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे संचालक विश्वास पाठक म्हणाले की, सर्व धोरण वीज निर्मिती भोवती फिरते, वीज निर्मितीच्या बरोबरीने वितरणावर लक्ष देण्याची गरज आहे असे यांनी सांगितले. वितरकांना उपलब्ध असलेल्या दराने वीज विकत घ्यावी लागते, मात्र वितरण करताना कमी दराने वीज विकावी अशी अपेक्षा केली जाते असे विश्वास पाठक यांनी सांगितले.
लोकांच्या व सरकारच्या अपेक्षा वीज वितरकांना पूर्ण कराव्या लागतात. लोकांपर्यंत वीज पोहचली पाहिजे हे पाहण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राकडे अतिरिक्त वीज आहे, पण आपण वीज पुरवठयावर अवलंबून राहतो, काही वेळा काही कारणांमुळे वीज पुरवणारे वेळेत वीज पुरवठा करु शकत नाहीत असे संजीव कुमार यांनी सांगितले. कमी वीज पुरवठा होतो त्यामुळे त्यादृष्टीने धोरण आखले गेले पाहिजे, एखादवेळ वीज पुरवठा केला नाही तर त्यात दंडाची तरतूद नसली पाहिजे असे संजीव कुमार म्हणाले.
Kuldeep Jain, MD, @cleanmaxsolar, talks about the inevitability of the adoption of rooftop solar in the near future at #LokmatUrjaSummit. pic.twitter.com/8SQnFDdvQ2— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) June 10, 2017