ऑनलाइन लोकमत/नीलिमा शिंगणे-जगडअकोला, दि. 25 - अकोला गार्डन क्लबच्यावतीने खंडेलवाल भवन येथे रविवारी पुष्प प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यामधील रंगीबेरंगी गुलाबपुष्प पाहून अकोलेकर अगदी मोहरू न गेले होते. या प्रदर्शनात विविध चार गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. चारही गटांमध्ये प्रथमस्थान प्राजक्ता कुळकर्णी यांनी पटकाविले. प्रदर्शनात गुलाब, मोगरा, झेंडू, शेवंती आदी विविध प्रकारची रंगीबेरंगी फुले ठेवण्यात आली होती. फुलांपासून बनविलेले गजरे, वेण्या, पुष्पगुच्छ आक र्षक पद्धतीने सजविले होते. फुलांसोबतच बोन्साय झाडे, कॅक्टस, वाळलेल्या झाडांच्या डहाळ्यांपासून तयार केलेल्या विविध वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. टेरीस गार्डन व किचन गार्डनमधील रोपट्यांचे सुंदररीत्या प्रदर्शन करण्यात आले.या प्रदर्शनात शहरातील ७०० पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. प्रदर्शनात आकर्षक आणि सुंदर फुलांना किंग, क्वीन, प्रिन्स आणि प्रिन्सेस अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्राजक्ता कुळकर्णी यांच्या गुलाब पुष्पांना चारही गटात पुरस्कार मिळाले.
VIDEO- रंगीबेरंगी गुलाबपुष्पांनी मोहरले अकोलेकर!
By admin | Published: December 25, 2016 11:12 PM