- नंदकिशोर नारे / ऑनलाइन लोकमत
धम्मानंद इंगोलेंचा शाहिरीतून संदेश
वाशिम, दि. 03 - जिल्हा परिषदेकडून हाती घेण्यात आलेल्या कुटुंबस्तर संवाद अभियानातून स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी संपूर्ण जिल्हा अक्षरश: झपाटला असून विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे. धम्मानंद इंगोले या शाहिराने तर चक्क मंगरुळपीर तालुक्यातील पारवा येथील जगदंबा देवीच्या यात्रेत ‘जगदंबेच्या यात्रेत येता...अन जगदंबेलाच उघडयावर पाठविता’ सांगत घरोघरी शौचालय बांधण्याचे आवाहन केले.
उघड्यावर होणा-या हागणदारीतून जिल्हयाला मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेतील स्वच्छता कक्षाच्या चमूने यशस्वी पुढाकार घेतला आहे. विशेष बाब म्हणजे गावोगावी होणाºया स्वच्छताविषयक जनजागृतीपर कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा, उपाध्यक्षांसह पदाधिकारी, स्वच्छता विभागाचे अधिकारी, कर्मचारी पुढाकार घेतांना दिसून येत आहेत. धम्मानंद इंगोले यांच्या शाहिरीतून मनोजरंजनात्मक कथा, शेरो शायरीमुळे यात्रेत रस्त्याने जाणारे नागरिकही खिळून उभे राहिले होते.