शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

VIDEO - भायखळयातील आगीवर फायर ब्रिगेडने मिळवले नियंत्रण

By admin | Published: October 29, 2016 8:06 PM

भायखळा पूर्वेला हुतात्मा बाबू गेनू नगरमध्ये भीषण आग भडकली आहे. फायरब्रिगेडच्या १० गाडया घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २९ - औंरगाबादमध्ये सकाळी फटाक्यांच्या स्टॉल्सना लागलेली भीषण आगीची घटना ताजी असताना शनिवारी संध्याकाळी भायखळा पूर्वेला हुतात्मा बाबू गेनू नगरमध्ये भीषण आग भडकली होती. फायरब्रिगेडच्या १० गाडयांनी मिळून आगीवर नियंत्रण मिळवले. 
 
बाबू गेनू नगरमधील काही घरे रिकामी करण्यात आली. मंडप डेकोरेटरच्या सामनामुळे आग पसरल्याची माहिती मिळत आहे. स्थानिकांच्या सर्तकतेमुळे जिवीतहानी टळली पण लाखो रुपयांचे सामान आगीत भस्मसात झाले आहे. हरीश अर्जुन पालव मार्ग चाळ थोडक्यात बचावली. वखारीच्या उत्तर व दक्षिण बाजूने अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
 
आणखी वाचा 
VIDEO: औरंगाबादमध्ये अग्नितांडव, फटाक्यांचे 200 स्टॉल्स जळून खाक
 
काही घरेही या आगीत जळाल्याची माहिती असून, शेजारची लाकडाची वखार आगीच्या विळख्यात आल्यामुळे आग अधिकच भडकली होती. तब्बल अर्ध्या तासानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती.शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत अधिक चौकशी करू, अशी प्रतिक्रिया डीसीपी प्रविण पडवळ यांनी दिली. आता कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. औरंगाबादमधल्या आगीत फटाक्यांची २०० दुकाने जळून खाक झाली तसेच २० ते २५ दुचाकी आणि चारचाकी वाहने भस्मसात झाली.