शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

व्हिडीओ- वर्षाला चार महिने भामरागड वासीयांवर राहते पुराचे संकट

By admin | Published: July 24, 2016 6:18 PM

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या भामरागड तालुक्याला दरवर्षी पुरामुळे मोठा फटका बसतो.

ऑनलाइन लोकमत

गडचिरोली, दि. 24 - महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या भामरागड तालुक्याला दरवर्षी पुरामुळे मोठा फटका बसतो. येथील नागरिकांचे व व्यापार्‍यांचे पुरामुळे मोठे नुकसान होते. चार महिने ही परिस्थिती कायम राहते. भामरागड परिसरातील गावांचे कायम पुनर्वसन करण्याची योजना तयार करण्यात आली होती. मात्र या योजनेला शासनस्तरावरून अजूनही मूर्तरूप देण्यात अजूनही यश आलेले नाही.राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती या मोठय़ा नद्यांसह बांडिया नदी, तुमरगुडा नाला, ताडगाव नाला हे मोठे जलस्त्रोत आहेत. आलापल्ली-भामरागड हा मुख्य मार्ग असून या मार्गावर नाले व नद्यांवरचे पूल ठेंगणे व अरूंद असल्याने तातडीने पावसाचे पाणी चढते व भामरागडकडे जाणार्‍या नागरिकांना अनेकदा रस्त्यावरच रात्र काढण्याचे प्रसंग येतात. अनेकवेळा हेमलकसा, ताडगाव, पेरमिली येथे नागरिक अडकून पडतात. २00६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलास देशमुख व उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी भामरागडच्या पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पर्लकोटा नदीचा पूल उंच करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र मागील दहा वर्षांपासून हे आश्‍वासन प्रत्येक सरकार देतच आहे. भामरागडवासीयांना सतत पुराचा फटका बसूनही पालकमंत्र्यांनी या भागात दौरा करून या भागातील नागरिकांचे साधे दु:खही जाणले नाही. अतवृष्टीमुळे अनेकदा जनजीवन विस्कळीत होते. रस्ते बंद होतात. नागरिकांना समूह निवासी शाळेत हलविले जाते व पूर ओसरला की नागरिक आपल्या घरी परतात. ओसरलेल्या पुरासह रोगराईचाही धोका दरवर्षीभामरागडवासीय अनुभवतात. जनजीवन विस्कळीत होते.गेल्या अनेक वर्षांपासून ३५ हजार लोकांच्या जीवाशी हा खेळ खेळला जात आहे. भामरागडवासीयांची व्यथा सरकार कधी समजणार, असा प्रश्न या भागात राहणार्‍या जनतेने सरकारला विचारला आहे. अडतानींनी दिला होता उंच जागा शोधून प्रस्तावाचा सल्ला तत्कालीन जिल्हाधिकारी मोहन अडतानी यांनी भामरागडच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार केला होता. योग्य उंच जागा निवडावी व ग्रामसभेने मंजुरी देऊन असा प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना केली होती. मात्र हा प्रस्ताव तेव्हापासून धूळ खात पडून आहे. पूर नियंत्रणासाठी उपाययोजनाही आखण्यात आलेल्या नाही. तहसीलदारांच्या उपस्थितीत दरवर्षी बैठक घेतली जाते. बाजारातील दुकानदारांना नोटीस पाठविल्या जातात. पुरामुळे पीडित होणार्‍या कुणालाही नुसानभरपाई दिली जात नाही. अशी परिस्थिती आहे.