ऑनलाइन लोकमत
कळवण (नाशिक), दि. २७ - दिवाळी सण आदीवासी भागात आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा करण्याची परंपरा आजही टीकून आहे. कळवण या आदीवासी , दुर्गम व अतिदुर्गम तालुक्यातील कोकणा , भिल्ल, महादेव कोळी या जमातीची दिवाळीची सुरुवात वाघबारशीने झाली.
तालुक्यातील कोकणा , भिल्ल , महादेव कोळी , या जमातीचे आदिवासी बांधव दिवाळीची सुरुवातच वाघबारशीने करतात. तालुक्यातील बोरदैवत , देवळीवणी , चिंचोरे या तीन गावांच्या शिवाराच्या सरहद्दीवर असलेल्या वाघदेवाच्या नावाने तर गेल्या कित्येक वर्षापासुन यात्राच भरते.
तिन्ही गावातील भगत व ग्रामस्थ गावाच्या सिमेवर असलेल्या वाघदेवा जवळ जमा झाले. आदिवासी पंरपरेनुसार प्रत्येक गावाच्या सिमेवर वाघदेवाच्या मुर्तीची दगडावर तथा चिर्यावर स्थापना केली. याला वाघदेवाचा चिरा किवा पाटली असे संबोधले जाते. या वाघदेवाच्या पाटलीवर, चि-यावर चंद्र,सूर्य ,नागदेव, वाघदेव, मोर आदी चित्रं कोरलेली असतात.