मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत असल्याने नोकरदारांनी गावाकडे धाव घेतली आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर गेला आहे. चाकरमानी गावाकडे जाऊ लागल्याने कोरोना पसरण्याची भीती नितेश राणेंनी नुकतीच व्यक्त केली होती. मात्र, आता एक भावनिक व्हिडीओ पोस्ट करत पुन्हा सिंधुदुर्ग संकटमुक्त ठेवण्याचे आवाहन केले आहे.
या व्हिडीओमध्ये सुरुवातीला EXIT असा फोटो घेतला असून त्यांनतर एक भावनिक आवाहन करणाऱ्या पंक्ती आहेत. यामध्ये कणकवली रेल्वे स्टेशनचा फोटो आणि अन्य फोटो लावले आहेत. तसेच गणेशोत्ववाचाही फोटो लावून गावाक परत जावचाच आसा, पण आता ती येळ नाय, असे आवाहन केले आहे.
सुटये गावलेत झिलानो म्हणान गावाक नको जाव,तुमच्याच गावात कोरोनाक रिघाक देतलात वाव.
गावाक सगळे खुशाल हत त्येंच्यात इघ्न नको हाडू, हातार तेंचा पॉट आसा बाबारे उगीच टेंशन नको वाढवू.
आवशी बापाशीक सांगा मी खुशाल आसय हयसर.काळजी नको करू हकडची, जपा स्वत:क थयसर.
गाव माझो स्वच्छ हा घराघरात स्वच्छता ठेवत रवा, जेवच्या खावच्या आधी रोजच साबनान हात धुवा.
आय़ेबाबाक काळजी आसा, तशी तुम्हीव तेंची घेवा. जिल्ह्यात आपल्या संकटा नको, ह्याच ध्यानात ठेवा.
गावाक परत जावचाच आसा पण आता ती येळ नाय. ऐकशात माझा लेकरांनो मी पडतय तुमच्या पाया.