ऑनलाइन लोकमत/नितीन गव्हाळे, अकोला, दि. 25 - लाखमोलाचा हिरा जवळ असणे कोणाला आवडत नाही. म्हणूनच लोक हिरा है सदा के लिए..., असे उगाच म्हणत नाहीत. अकोला पोलीस दलातील श्वान हिरा आणि तिची कामगिरी लाखमोलाची आहे. खून, दरोडा, लूटमार, चोरीसारखे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस श्वान हिराची आवर्जून मदत घेतात. म्हणूनच पोलीससुद्धा या श्वानाला हिरा है सदा के लिए..., असे म्हणतात. हिराची कामगिरी, तिचे कर्तव्यही तिच्या नावाला शोभेल असेच आहे. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी, तपासासाठी पोलिसांची कामगिरी जेवढी महत्त्वाची, तेवढीच पोलीस श्वानांचीसुद्धा आहे. चार जिल्ह्यांतील गुन्हे शोधाची कामगिरी एकट्या हिरावर आहे. आतापर्यंत हिराने खुनाचे १४ गुन्हे उघडकीस आणून आरोपींना जेरबंद करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. हिराने दरोडा, लूटमार प्रकरणांमधील आरोपीसुद्धा गजाआड करण्यात पोलिसांना मदत केली. त्यामुळेच श्वान हिराला अमरावती, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांमधील गुन्हे तपासासाठी विशेष करून निमंत्रित केले जाते. गुन्हे शोध व बॉम्बशोधक पथकातील श्वान तपास स्पर्धेमध्ये सर्वाधिक गुन्हे उघडकीस आणण्याचा विक्रम हिराच्या नावावर अबाधित आहे. राज्यातून हिराने प्रथम क्रमांक पटकावला आहे. घडलेल्या प्रत्येक गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांना हिराची गरज भासते. प्रत्येकवेळी हिरा मदतीला धावून येते. पीएसआय सुजित डांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजू चौधरी यांनी हिराला प्रशिक्षित केले. श्वान हिराची कामगिरीकाही दिवसांपूर्वी हेंडज येथे युवकाची हत्या झाली. हिराने याचा तपास करून त्याच्या वडिलावरच झडप घेऊन त्यांना पकडून दिले. पिंजर पोलीस ठाण्यांतर्गत गावात अनैतिक संबंधातून एका युवकाने त्याच्या चुलत भावाची हत्या केली होती. ही हत्यासुद्धा हिराने उघडकीस आणली. यासोबतच बंडू गिरी हत्याकांडातील आरोपीपर्यंत पोहोचविण्यात हिराने पोलिसांना मदत केली होती. डाबकी रोडवरील २१ लाख रुपयांच्या लूटमार प्रकरणात हिराने आरोपी पकडून दिला. अकोट फैल पेट्रोल पंपावरील रोख पळविण्याच्या प्रकरणातही हिराने आरोपीच्या घरापर्यंत धाव घेऊन पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचविले होते. रिसोडमधील दरोड्याचा बनाव करून हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी काठीच्या गंधावरून हिराने ओळखला होता.
VIDEO- दुस-यांच्या हातचे जेवणही घेत नाही "हिरा"
By admin | Published: June 25, 2017 8:44 PM
ऑनलाइन लोकमत/नितीन गव्हाळे, अकोला, दि. 25 - लाखमोलाचा हिरा जवळ असणे कोणाला आवडत नाही. म्हणूनच लोक हिरा है सदा ...
https://www.dailymotion.com/video/x8456l7