नंदकिशोर नारे/ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 6 - भारत स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात शौचालय उभारणीसाठी मोठया प्रमाणात नवनवीन क्लुप्त्या लढवून जनजागृती केल्या जात आहे. आता नवीनच उपक्रम पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राबविला असून, संपूर्ण गावासमोर शौचालय नसणारे खजिल होत असल्याचे चित्र आहे.भारत स्वच्छ अभियानांतर्गत घरोघरी शौचालय उभारल्या जावेत, उघडयावर शौचास जाणे बंद व्हावे यासाठी जनजागृती मोठया प्रमाणात केल्या गेली. त्यानंतरही अनेकांच्या घरी शौचालय आजच्या घडीला नसल्याने जिल्हा परिषदेच्या वतीने नवीनच शक्कल लढविण्यात आली. ज्या व्यक्तीच्या घरी शौचालय नाही त्यांच्या घरासमोर जाऊन 'घरी संडास नाही तुझ्या.... बायको जाते उघडयावर..' हे गीत संपूर्ण गावकऱ्यांसमोर माईकवर गायलं जात आहे. या प्रकारामुळे अनेक नागरिक पथक गावात आल्याबरोबर गावातून पळ काढत आहेत किंवा कलाकार घरासमोर येण्याआधीच शौचालय दोन दिवसात बांधण्याचे आश्वासन देत आहेत. जिल्हा परिषदेने सुरु केलेल्या या उपक्रमाचे मुख्याधिकारी गणेश पाटील यांनी चमुचे कौतुक केले.
https://www.dailymotion.com/video/x844h27