ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १३ - जन्मताच वजन कमी असल्याने आणि प्रकृती गंभीर असलेल्या नवजात बाळाला रुग्णवाहिकेने वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात येत असताना वाशिम येथील रेल्वेफाटक बंद असताना आणि या ठिकाणी उड्डाणपूल नसल्यामुळे १५ मिनिटे प्रतिक्षा करावी लागली. त्यामुळे आधीच प्रकृती गंभीर असलेल्या बाळाचा जीव धोक्यात आला.
मंगरुळपीर तालुक्यातील पोटी आरोग्य उपकेंद्रात एका महिलेने सोमवारी सकाळी बाळाला जन्म दिला; परंतु सदर बाळाचे वजन हे केवळ बाराशे ग्रॅम अर्थात जेमतेम सव्वा किलो असताना पोटी उपकेंद्रातील डॉक्टरांनी त्याला तातडीने वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला आणि त्याचवेळी बाळाला दवाखान्याच्या रुग्णवाहिकेने वाशिम येथे रवाना करण्यात आले; परंतु वाशिम शहराच्या बाहेर असलेल्या रेल्वे फ ाटकाजवळ ही रुग्णवाहिका थांबवावी लागली, कारण त्या ठिकाणी उड्डाण पुल नसल्यामुळे आणि रेल्वे येण्याची वेळ असल्याने फाटक बंद करण्यात आले होते. त्यामुळे नाईलाजास्तव त्या ठिकाणी १५ मिनिटे रुग्णवाहिका थांबवून ठेवावी लागली. या कारणामुळे बाळाची प्रकृती अधिकच गंभीर झाली