शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

VIDEO : नाशिकमध्ये यांत्रिकीकरणामुळे मुरमुरा व्यवसायावर संक्रात

By admin | Published: August 09, 2016 9:42 AM

घोटी शहरासह इगतपुरी तालुक्यातही मुरमुरा भट्टयांनी बदलत्या काळात या व्यावसायाचेही यांत्रिकीकरण झाल्याने हा व्यवसाय संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

सुनील शिंदे
ऑनलाइन लोकमत
घोटी(नाशिक), दि. ९ -  घोटी शहरासह इगतपुरी तालुक्यातही  मुरमुरा भट्टयांनी बदलत्या काळात या व्यावसायाचेही यांत्रिकीकरण झाल्याने हा व्यवसाय संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले इतर उद्योगही बंद होण्याच्या मार्गावर आहे.भातावर प्रक्रिया करून तांदूळ निर्मितीसाठी भात मिला उभ्या राहिल्या आणि भाताच्या गिरणीची घरघर बंद झाली.तसेच यांत्रिकीकरणा मुळे मध्यरात्री सुरु होऊन सकाळी संपणारा हा कायमचा संपण्याच्या मार्गावर आहे.यामुळे मुरमुरा निर्मिती करून उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
    पावसाचे माहेरघर म्हणून समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात पन्नास वर्षापूर्वी प्रचंड आणि मुसळधार पाऊस होत असल्याने,तसेच तालुक्याचे वातावरण भात पिकाला पोषक असल्याने भाताचे विक्रमी उत्पादन होत असे.केवळ सेंद्रीय खताचा वापर होत असल्याने या भाताला सर्वत्र जोरदार मागणी होत होती.यातच भाताचे गरि कोळपी हे वाण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या तांदळाला प्रचंड मागणी असल्याने घोटी बाजारपेठ याच तांदळासाठी प्रसिद्ध झाली.आणि यामुळे भाताचे सर्वत्र प्रचंड उत्पादन होऊ लागले.या भातावर प्रक्रिया करणारे अनेक लघु उद्योग त्याच काळात घोटी शहरात उभे राहिले.भातापासून तांदूळ निर्मिती व भातापासून मुरमुरा निर्मिती अशा दोन प्रमुख व्यवसायाने मात्र घोटी शहराला नावलौकिक मिळवून दिला. एकट्या घोटी शहरात त्यावेळी मुरमुरा निर्मिती करणाऱ्या शेकडो भट्ट्या उभ्या राहिल्या.या भट्ट्यानी अनेक जणांना रोजगार,तर अनेकांना मान,सन्मान,व प्रतिष्टा मिळवून दिली.या उद्योगांनी हजारो जणांना रोजगार उपलब्ध करून दिला. हळू हळू तालुक्यात धरणाची निर्मिती होऊ लागली.यामुळे शेतकऱ्यांनी भात उत्पादनाला दुय्यम स्थान देत बागायती,व संकरित भाताच्या बियाणाला अधिक प्राधान्य देत,कमी वेळेत,कमी भांडवलात जास्त उत्पादन देणाऱ्या बियाणाच्या लागवडीकडे अधिक कल दिल्याने भाताच्या उत्पादनात कमालीची घट झाली.परिणामी यावर अवलंबून असणारे अनेक लघु उद्योग धोक्यात आले.हा उद्योग धोक्यात येण्याची अनेक कारणे आहेत.मुरमुरा निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत तसेच मजुरीत वाढ झाल्याने हा खर्च व मिळणारा नफा यात प्रचंड तफावत निर्माण झाल्याने अनेकांनी हा व्यवसाय बंद केला आहे. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या मजुरावर,व इतर घटकावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.तरीही परिस्थितीवर मात करीत व मुरमुरा व्यवसायाच्या यांत्रिकीकरणाशी स्पर्धा करीत अनेकांनी हा व्यवसाय अद्यापही शाबूत ठेवला आहे.
  पारंपारिक मुरमुरा भट्टीत एक पोते भातापासून साधारणता आठ पोते मुरमुरा निर्माण होते.यातून भात खरेदी,मजुरी,मेहनत व इतर खर्च वगळता मालकाच्या हातात अत्यल्प नफा मिळत असतानाही या व्यवसायाचे अस्तित्व जतन करण्यासाठी घोटीतील भट्टी मालकाची केविलवाणी धडपड चालू आहे. भांडवलदाराच्या लहान उद्योगासाठीही शासन व वित्तीय संस्था आर्थिक पाठबळ देऊन व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी सहकार्य करते परंतु गेली पन्नास वर्षापासून पारंपारिक असलेल्या या व्यवसायाची ना शासनाने दाखल घेतली ना वित्तीय संस्थांनी. शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा व्यवसाय इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.
 
 अशी होते मुरमुरा निर्मिती :-
  मुरमु-यासाठी आवश्यक असणाऱ्या भाताला सर्वप्रथम पाण्याच्या हौदात भिजत घातले जाते.पूर्णपणे भात भिजल्यानंतर या हौदातील पाणी काढून भात पूर्णपणे सुकविले जाते. तसेच हे भात गरम उकळत्या पाण्यात टाकून काढले जाते. हे भात सुकल्यानंतर गिरणीतून त्याचे तांदूळ काढले जातात.या तांदळाला एक कामगार मिठाचे पाणी लावून दुसऱ्या कामगाराकडे देतो. हा कामगार हे तांदूळ गरम कढईत मिठ व तांदूळ एकजीव करण्यासाठी गरम करतो.एकजीव केलेले तांदूळ या भट्टीचा मुख्य कारागीर समुद्राच्या गरम रेतीत टाकतो. आणि याच ठिकाणी तांदळापासून मुरमुरा तयार होतो. हा मुरमुरा चाळून बारदानाच्या अथवा प्लास्टिकच्या पोत्यात भरला जातो.