शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

VIDEO - अंधश्रद्धा संपता संपेना, तुम्हीच बघा!

By admin | Published: September 20, 2016 5:11 PM

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सातत्याने प्रात्यक्षिक करून जनजागृती करतात. परंतु त्याचा बोध घेतला जात नसल्याचे मंगळवारी दुपारी लोकमतने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान दिसून आले.

95 टक्के वाहनधारक घाबरले ‘ओलांड्या’ला!
नितीन गव्हाळे, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 20 - माहिती व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये माणूस प्रगत झाला आहे. परंतु विचार प्रगत झालेले नाहीत.  सुशिक्षित समाजमनावर अंधश्रद्धेचा पगडा प्रचंड आहे. भूत, भानामती, जादुटोणा, मंत्रतंत्राविषयी समाजामध्ये असलेली भिती जराही कमी झालेली नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सातत्याने प्रात्यक्षिक करून जनजागृती करतात. परंतु त्याचा बोध घेतला जात नसल्याचे मंगळवारी दुपारी लोकमतने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान दिसून आले. लोकमत चमूने एका पत्रावळीमध्ये लिंबू, मिरची, कुंकवाने मढवलेला कणकेचा गोळा, दिवा, हळद, कुंकू आणि गुलाल असे  साहित्य  ज्याला ‘ओलांडा ’  म्हणून संबोधले जाते हे सर्व साहित्य रस्त्याच्या मधोमध ठेवून सर्वेक्षण केले. सर्वेक्षणादरम्यान एक तासामध्ये १३७ दुचाकी, ८ चारचाकी वाहने व २३ पादचारी गेलेत. यातील ९५ टक्के लोकांनी कथित पूजा साहित्यावरून जाण्याचे टाळले. यावरून समाजमनामध्ये अंधश्रद्धेबाबत प्रचंड भिती असल्याचे दिसून आले. 
 
२१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अंधश्रद्धा निर्मुलन दिन म्हणून पाळल्या जातो. समाजामध्ये जादुटोणा, तंत्रमंत्र, अघोरी विद्या या थोतांड असणाºया अंधश्रद्धेविषयी शासनानेही कायदा केलेला आहे. अंधश्रद्धा बाळगू नका. अशी सातत्याने जनजागृती केली जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय शाळांमध्ये जावून जादूटोणा, बुवाबाजी, भानामती कसे थोतांड आहे. याबाबत नागरिकांना जागरूक करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. परंतु वैज्ञानिक युगामध्येही उच्चशिक्षित, सुशिक्षित नागरिक अंधश्रद्धेच्या पगड्यातून बाहेर पडायला तयार होत नाहीत. एवढी प्रचंड भिती त्यांच्या मनामध्ये बुवाबाजी, जादुटोणाचे थोतांड मिरवणाºया तथाकथीत धुरीणांनी निर्माण करून ठेवली आहे.
 
अंधश्रद्धा निर्मुलन दिनानिमित्त लोकमतने सर्वेक्षण केले. लोकमत चमूने एका पत्रावळीत  हे  साहित्य रस्त्यावर ठेवले आणि नागरिकांमध्ये अंधश्रद्धा किती ठासून भरली आहे. याची पाहणी केली. पाहणीदरम्यान ९५ टक्के वाहनचालकांनी रस्त्याच्या मधोमध ठेवलेले साहित्य, लिंबू, मिरची ओलांडण्याची हिंमतच केली नाही. उलट अनेकांनी हे साहित्य पाहून वाहने दुसºया बाजूने वळून घेतल्याचे दिसून आले.
 
पोलीस दादा तुम्ही सुद्धा?
अंधश्रद्धा निर्मुलनामध्ये पोलिसांची भुमिका महत्वाची आहे. पोलीसही समाजमनातील भिती घालविण्यासाठी कार्य करतात. कोणी तथाकथित महाराज बुवाबाजी, भानामती, जादूटोणा करीत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटकाव करतात. असे असतानाही पोलीससुद्धा मनामध्ये अंधश्रद्धा बाळगत असतील तर काय बोलावे. रस्त्यावरील हे साहित्य पाहून पोलीस व्हॅनसह अनेक पोलीस दादांनी त्यावरून जाण्याचे टाळले.