ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १ - बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा शेतक-यांचा सण म्हणजे पोळा. यादिवशी वर्षभर शेतीत राबणा-या सर्जा राज्याच्या जोडीची पूजा अर्चा करुन त्यांना गोडधोड पदार्थ खाण्याकरिता देतात. अनेक घरोघरी बैलांची पूजा केल्या जाते. यावेळी शेतक-यांच्यावतिने त्यांना सजविण्यात येते. बांशिग, घुंगरु, विविध रंगबिरंगी माळा, शिंगाला रंग लावून सजविण्यात येते. यावर्षी ग्रामीण भागात भरविण्यात येत असलेल्या पोळयामध्ये महाराष्ट्रात कहर माजविणा-या ‘सैराट’ चित्रपटाने वेड लावले. यामध्ये शेतकरीही मागे राहिलेला नाही. बैलाची सजावट करतांना अनेक बैलांच्या पाठीवर ‘सैराट’, झिंगाट असे लिहिलेले आढळून आले. तसेच बैलाला पोळयात नेण्यासाठी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली त्यातही सैराटचेचे गित ‘झिंग झिंग झिंगाट’ वाजतांना दिसून आले.