संतोष वानखडे /ऑनलाइऩ लोकमत
वाशिम, दि. 2 - ऐन सोयाबीन सोंगणीच्या हंगामात परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतक-यांची धांदल उडत आहे. हातातोंडाशी आलेला सोयाबीन घास वाचविण्यासाठी शेतक-यांची लगबग सुरू असून, सोयाबीन सोंगणीनंतर एका ठिकाणी सोयाबीनची ‘सुडी’ (गंजी) लावण्यात शेतकरी व्यस्त असल्याचे दिसून येते. गत तीन वर्षांपासून दुष्काळाशी दोन हात करणा-या शेतक-यांना यावर्षी निसर्गाने साथ दिल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मात्र, नेमके सोयाबीन सोंगणीच्या हंगामात परतीचा पाऊस सुरू झाल्याने शेतकºयांची धांदल उडाली आहे. पावसाने उघडीप देताच, शेतकरी सोयाबीन सोंगणीत व्यस्त होतात. सोंगलेले सोयाबीन वाचविण्यासाठी ताडपत्री किंवा अन्य साधनांनी सोयाबीनची गंजी झाकली जात आहे. गत चार-पाच दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात परतीचा पाऊस कमी-अधिक प्रमाणात ठाण मांडून आहे. यामुळे शेतक-यांची चिंता अधिकच वाढली असून, हातातोंडाशी आलेला घास वाचविण्यासाठी बळीराजा शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.
पाहा व्हिडीओ-