संदीप गावंडे / ऑनलाइन लोकमत
नांदुरा,(बुलडाणा) दि. 8 - उलट्या काळजाच्या सरकारला सरळ सांगून समजत नाही म्हणून शेतक-यांनी ‘उलटे टांगो’ आंदोलन करत सरकारच्या भाषेत समजविण्याचा प्रयत्न केला. नांदुरा तालुक्यातील तीन गावातील शेतक-यांनी धानोरा शिवारातील शेतात आंब्याच्या झाडाला उलटे लटकून गुरुवारी अभिनव आंदोलन करित सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गेल्या १ जूनपासून शेतक-यांचा संप सुरुअसून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली जात आहेत. याअंतर्गत गुरुवार ८ जून रोजी नांदुरा तालुक्यातील धानोरा विटाळी, काटी व शिरसोडी या तीन गावातील शेतकºयांनी एकत्र येवून आपल्या मागण्यांसाठी आंब्याच्या झाडाला उलटे टांगण्याचे आंदोलन केले. आंब्याच्या डहाळ्यांना उलटे लटकवून घेत शेतकºयांनी उलट्या काळजाच्या सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी शेतकरी गुलाबराव पाटील, समाधान वानखडे, भानुदास पाटील, सोपान चोपडे, रमेश पाटील, सुभाष कोल्हे, भागवत वानखडे, गोंविद गिरी, देविदास पाटील, विष्णू पाटील, भागवत पाटील, मोहन पाटील, माणिकराव नरवाडे, श्रीकृष्ण दांडगे, प्रकाश दांडगे, विष्णू वानखडे, अमोल वानखडे, जानराव ठाकरे, आशिष बाठे, अजाबराव जंगले, कैलास नरवाडे, संदीप चोपडे, शत्रुघ्न चोपडे, मंगेश गाडे, भाऊराव नरवाडे, तुकाराम बोंडे, भानुदास बोरसे, सुरेश नरवाडे, अशोक नरवाडे, अशोक आमले, दिनेश बोंडे, किशोर बोंडे, सुनिल बोंडे यांची उपस्थिती होती.
शेतक-यांमध्ये वाढता रोष !
शेतक-यांच्या मागण्या पूर्ण करण्यास सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने व निवडणूकदरम्यान दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडल्याने शेतक-यांनी यावेळी सरकारबद्दल रोष व्यक्त केला. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी आदी मागण्यांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
पाहा व्हिडीओ-
https://www.dailymotion.com/video/x8452nm