शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

VIDEO: औरंगाबादमध्ये अग्नितांडव, फटाक्यांचे 200 स्टॉल्स जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2016 12:09 PM

जिल्हा परिषदेच्या मैदानात फटाक्यांच्या स्टॉल्सना लागलेल्या भीषण आगीत तब्बल 200 स्टॉल्स आणि वाहने जळून खाक झाली आहेत

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 29 - जिल्हा परिषदेच्या मैदानात फटाक्यांच्या स्टॉल्सना भीषण आग लागली होती. या मैदानात असणारे जवळपास 200 फटाक्यांचे स्टॉल्स आगीत जळून खाक झाले आहेत. एकमेकांना लागून फटाक्यांचे स्टॉल्स असल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकली. आगीमध्ये 20 ते 25 दुचाकी आणि अनेक चारचाकी वाहनेदेखील जळून भस्मसात झाली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीमुळे कोट्यवधीचं नुकसान झालं आहे. सध्या आग आटोक्यात आली आहे.
 
गंभीर बाब म्हणजे निवासी परिसरात ही घटना घडली आहे. दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याची माहिती अजूनही अस्पष्ट आहे. मात्र शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी स्थानिकांसह फायर ब्रिगेडदेखील शर्थीचे प्रयत्न करत होते. आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या, पोलिसांचे पथक आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली होती. 
 
 
आगीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई देणार असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं आहे. दरवर्षी या मैदानावर फटाक्यांचं मार्केट भरलेलं असत. मात्र ही आग पाहता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणती उपाययोजना केली नव्हती का ? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. आग लागली असल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेण्यास सुरुवात केली असल्याने गर्दी होऊ लागली होती. पोलिसांनी औरंगाबादकरांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं होतं.