यवतमाळ : पांढरकवडा येथील एका भाजप नेत्याच्या दोन पत्नींमध्ये त्याच्या वाढदिनीच फ्रीस्टाईल झाली. मंगळवारी रात्री 10 वाजता वाय पॉईंट येथील जलपर्णी हॉटेलसमोर हा प्रकार घडला. यावेळी या नेत्यालाही प्रसाद मिळाल्याचे समजते.
या नेत्याच्या एका पत्नीने दुसऱ्या पत्नीला चप्पलेचा प्रसाद दिला. दुसऱ्य़ा पत्नीसोबत चार ते पाच महिला होत्या. त्यांनीही तिला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाल्याने या गरमागरम फ्रीस्टाईलची चर्चा अख्ख्या जिल्ह्यात होत आहे.
मारहाणीच्या प्रकारावेळी हा नेताही हजर होता. यावेळी त्यालाही प्रसाद मिळाला. मात्र, या मारहाणीचा व्हिडिओ मिळू शकला नाही. मारहाणी नंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. मात्र, नेत्यासह कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्याने तक्रार दाखल झाली नाही.
आमदार राजू तोडसाम यांची भाजपातून हकालपट्टी करण्याची मागणी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या लोकसभा मतदारसंघातील व भाजपाचेआमदार राजू तोडसाम यांच्या विधानसभा मतदारसंघातील पांढरकवडा येथे बचतगटाच्या महिलांना संबोधित करण्यासाठी येत आहेत. भाजपाकडून मोदींच्या या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू असताना व तीन लाख महिलांना मेळाव्यासाठी उपस्थित ठेवण्याची धडपड सुरू असताना भाजपा आमदाराचे दुसऱ्या पत्नीला पहिलीकडून झालेल्या मारहाणीचे हे प्रकरण चव्हाटयावर आल्याने भाजपा नेतृत्वाची चांगलीच कोंडी झाली आहे. मोदींचा दौरा लक्षात घेऊनच पोलीस ठाण्यात प्रकरण रेकॉर्डवर न घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केले गेले. अखेर त्यात त्यांना यशही आले.