ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 19 - वाळूची वाहतूक करणा-या भरधाव डंपरने तीन वर्षांच्या मुलाला चिरडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. देवांश कैलास भदाणे असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर संतापलेल्या स्थानिकांनी भररस्त्यात डंपर पेटवून दिला. सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
दरम्यान, देवांशच्या मृत्यूमुळे परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले. दक्ष त्याच्या काकासोबत कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडला होता. यावेळी घराकडे परतत असताना भरधाव येणा-या डंपरने त्याला चिरडलं. यानंतर तातडीने देवांशला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
https://www.dailymotion.com/video/x844vug