शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

VIDEO - कर्तृत्ववान महिलांचा सखी सन्मान पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2016 8:25 PM

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 5 - आपल्या सेवेतून मानवतेची ज्योत तेवत ठेवणा-या, सामान्य ते असामान्य असा प्रवास करणाºया जिल्ह्यातील ...

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 5 - आपल्या सेवेतून मानवतेची ज्योत तेवत ठेवणा-या, सामान्य ते असामान्य असा प्रवास करणाºया जिल्ह्यातील कर्तृत्वान स्त्रियांचा सन्मान ही खरे तर समाजीक जबाबदारीच आहे. ‘लोकमत’ ने या साठी पुढकार घेतला ही गौरवाची बाब असुन अशा सेवाव्रतींमुळे इतरांना प्ररेणा मिळते व या माध्यमातुन महिला सशक्तीकरण व सबलीकरणाचा मार्ग प्रशस्त होतो अशा शब्दात अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 
 
 शनिवारी  येथील हॉटेल तुषार एक्झेकटीव्हच्या  सभागृहात आयोजित एका शानदार सोहळ्यात लोकमत सखी मंचच्या वतीने   कर्तुत्वान महिलांचा ‘सखी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.  यावेळी अकोल्याचे जिल्हाधिकारी बोलत होते. मंचावर  महापौर उज्वलाताई देशमुख, लोकमतचे सहायक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल, निवासी संपादक रवी टाले उपस्थित होते. यावेळी सामाजिक क्षेत्रासाठी  झिंगुबाई बोलके  आरोग्य विभागामधून  डॉ.उज्ज्वला मापारी क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल महराष्टÑाच्या पहिल्या महिला कुस्ती वस्ताद  सुनिता कडोळे व्यावसायीक  क्षेत्रामधून बांधकाम व्यावसयीक  निलाक्षी नाथ नरवाडे शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल  वंदना नारे  तर सांस्कृतिक-साहित्यिक क्षेत्रासाठी  सीमा शेटे-रोठे  यांना सखी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला तर हॉटेल तुषारच्या व्यवस्थापिका राखी हेमनाणी यांचा विशेष सन्मान करण्यात आला  जिल्हाधिकारी म्हणाले की, महिलांचा सन्मान हा घरातुनच झाला पहिजे. आपल्या घरातील मुलांवर असे संस्कार झाले तर समाज वाईट प्रवृत्ती वाढणार नाही. महिला अबला नाहीत त्या सबलाच आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये एकाही महिलेचा समोवश नाही. संसाराचा डोलारा सांभाळतांना महिला अतिशय जिद्द व मेहनतीने यशाचे शिखर गाठत असते त्यामधील काही प्रातिनिधी महिलांचा सन्मान या ठिकाणी झाला ही बाब अतिशय गौरवाची आहे. महिलांच्या विकासासाठी विविध योजना आहेत त्यांच्यापर्यत पोहचवा, त्यांच्या लाभ त्यांनाच मिळेल या साठी प्रत्येकाने जागृत राहावे तसेच ग्रामिण भागातील शौचालय निर्मितीला गतिमान करण्याचाही संकल्प सर्वानी केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.  महापौर उज्ज्वलाताई देशमुख यांनी स्त्री भ्रुण हत्येचे वास्तवाची जाणीव करून देत महिलांनी या विरोधात आक्रमकपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन केले. महिलांचा सन्मान ही समाजामधील सकारात्मक बदलाचे चिन्ह असुन महिलांनीही अधिक जबाबदारी घेत आपली क्षमता सिद्ध केली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
https://www.dailymotion.com/video/x84bje8