मयूर गोेलेच्छा, ऑनलाइन लोकमत
लोणार (बुलडाणा), दि. २७ - लोणार येथील जागतिक स्तरावरील खा-या पाण्याच्या सरोवर परिसरात अनेक पर्यटक घाण करीत असल्यामुळे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात जर्मनीहून आलेले संशोधकही सहभागी झाले होते. लोणार येथे खारे पाणी असलेले जगातील दुस-या क्रमांकाचे सरोवर आहे.
सरोवर पाहण्यासाठी तसेच याचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. सदर पर्यटक या ठिकाणी कचरा टाकतात. त्यामुळे हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानादरम्यान दरवर्षी १०० तास म्हणजेच आठवड्यातून दोन तास साफसफाई करणार असल्याची शपथ लोणारमधील नागरिकांनी घेतली. तसेच स्वत:हून या ठिकाणी घाण न करता सरोवराचे महत्व कायम ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची शपथ घेण्यात आली.