ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. १९ : तालुक्यातील खडांगळी येथील शहिद जवान संदिप सोमनाथ ठोक यांच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सहकार राज्यमंत्री दादा भूसे, प्रांताधिकारी महेश पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधि, ग्रामस्थ मोठ्या संखेने हजर होते.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून लष्करात भरती होण्याची जिद्द पहिल्यापासून संदिपच्या मनात होती. संदीप पदवीधर असून 2014 मध्ये सैन्य दलात भरती झाले. बिहार, बंगलोर, पश्चिम बंगाल, भूतान व जम्मू काश्मीर येथे त्यांनी काम केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे.
रात्री उशीरा ओझर विमानतळावरुन त्यांचे पार्थिव खडानगळी गावाकडे रवाना झाले. १० वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या मुळ गावी पोहचले. गावातील महिलांनी स्मशानभुमीकडील रस्त्यावर रांगोळ्या काढल्या, फुलांच्या माळासह संपुंर्ण परिसर सुशोभित करण्यात आला होता. शहीद संदीप ठोक अमर रहेच्या घोषणांनी परिसर गहिवरला. परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती. शासकीय अधिकारी तेथे होते. काश्मीर खोऱ्यात प्रत्यक्ष सीमारेषेपासून जवळच असलेल्या बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील १८ जवान शहीद झाले आहेत, यामध्ये महाराष्ट्रातील ४ सुपुत्रांचा समावेश आहे. प्राणहानीच्या दृष्टीने अलीकडच्या काळातील लष्करी तळावरील हा सर्वांत भीषण हल्ला होता. दरम्यान या हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी १५ लाखांची मदत जाहीर केली आहे.
Last rites of martyr sepoy TS Somnath (who lost his life in Uri terror attack) in Nashik (Maharashtra) #UriAttackspic.twitter.com/EX6MJ3dBjr— ANI (@ANI_news) September 19, 2016