संजय लचुरिया/ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.25- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आता खाकी हाफ पँटऐवजी तपकिरी रंगाच्या पूर्ण पँटमध्ये दिसत आहे. नागपूरच्या रेशमबागमध्ये विजया दशमीच्या पार्श्वभुमीवर संघाच्या स्वयंसेवकांनी कसरत केली. यावेळी संघाचे स्वयंसेवक खाकी हाफ पँटऐवजी तपकिरी रंगाच्या पूर्ण पँटमध्ये कसरत करताना दिसले.
गणवेश बदलण्याचा निर्णय मार्च महिन्यात राजस्थानातील प्रतिनिधी सभेत एकमुखाने घेण्यात आला होता. संघाने १९४० मध्ये गणवेशात अंशत: बदल केला होता. यापूर्वी खाकी रंगाचा सदरा आणि खाकी रंगाची हाफ पँट असा गणवेश होता. मात्र, १९४० मध्ये त्यात बदल करून पांढऱ्या रंगाचा सदरा व खाकी हाफ पँट असा गणवेश करण्यात आला. तर १९७३ मध्ये चामडय़ाच्या बुटांची जागा रेक्झिन बुटांनी घेतली होती.