उद्धव फंगाळ
ऑनलाइन लोकमत
मेहकर, दि. १ - जग बदलले असून, आता सणांचे स्वरूपही बदलत जात आहे. याचाच प्रत्यय गुरूवारी मेहकर येथे आला. शेतक-यांची अस्मीता असलेल्या बैलांच्या जागी चक्क ट्रॅक्टरचा पोळा भरला. सर्वत्र पोळा सण उत्साहात साजरा होत असून, आधुनिक तंत्रज्ञानामुळे बैलांसोबत बरीचशी कामे ट्रॅक्टरमुळे कमी वेळात होवू लागल्याने १ सप्टेंबर रोजी मेहकरमध्ये शिवसेना-युवासेनेच्यावतीने ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार शहरात पहिल्यांदाच ट्रक्टरचा पोळा भरला.स्थानिक विश्रामगृहावर तालुक्यातील सर्व ट्रॅक्टर मालकांनी बिना ट्रॉलीचे ट्रॅक्टर सजवून आणले.. तेथून वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या पोळ्यात शेतकºयांचाही सहभाग उत्सफूर्त होता.
हा पोळा पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली. संपूर्ण जिल्ह्यात ट्रक्टरचा पोळा हा औत्सूक्याचा विषय बनला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय जाधव, तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, महाराष्ट्र अर्बनचे अध्यक्ष ऋषी जाधव, शहरप्रमुख जयचंद बाठीया यांची उपस्थिती होती.