ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 15 - शहरातील मानाचा म्हणून प्रख्यात असलेल्या बाराभाईच्या गणपतीची राज्याचे गृहराज्यमंत्री तथा अकोल्याचे पालक मंत्री डॉ रणजीत पाटील यांच्या हस्ते आरती करून निरोप देण्यात आला . विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशांच्या तालावर राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ रणजीत पाटील यांनीही ठेका धरून कार्यकर्त्यांच्या उत्साह वाढविला. जिल्ह्यात तब्बल एक हजार ७७१ गणेश मंडळांची नोंदणी असून, शहरात ६८४ मंडळांची नोंदणी आहे. सकाळी दहा वाजता मिरवणुकीला प्रांरभ झाला असून रात्री १२ पर्यंत मिरवणुक चालणार आहे. या मिरवणुकीसाठी पोलीसांनी चोख बंदोबस्त केला असून यावर्षी प्रथमच शांतीदूत ही संकल्पना राबविण्यात आली आहे. या माध्यमातुन पोलीस हस्तक्षेपाविना मिरवणुक पार पाडण्याचा संकल्प आहे.