नंदकिशोर नारे, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २० - वाशिम नगरपालिकेच्यावतीने शहरात स्वच्छता अभियान, शौचालयाची उद्दीष्टपूर्ती व जनजागृतीचा आढावा दररोज घेतला जात आहे. यामध्ये खुद्द वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे आवर्जून सहभागी राहून या उपक्रमास गती देण्याचे कार्य करीत आहेत. आढावा संदर्भात सुशिलाबाई घुगे नामक महिलेने बचत गटामुळे कसे संसार फुलले, त्याचे महत्व आपल्या विशेष शैलीतून नागरिकांसमोर सादर केले.
शहरातील माहुरवेस, पंचशिलनगर, गोंदेश्वर भागासह शहरातील अनेक भागात भारत स्वच्छता अभियानांतर्गंत भेटी दिल्यात. यामध्ये नागरिकांनी उघडयावर शौचास जावू नका, शौचालये बांधा, स्वच्छता पाळा, कचरा घंटागाडीतचं टाका याशिवाय विविध विषयांवर मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी स्वच्छता निरिक्षक डाखोरे, महाले, जितु बढेल, अभियंता घुगरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.