रामदास शिंदे/ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 25 - गत शेकडो वर्षांपासून पिढ्यानपिढया पारंपरिक पिकांच्या विळख्यात सापडलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेतीकडे वळवण्यासाठी आता स्थानिक शेतीतज्ज्ञांनी पुढाकार घेतला असून भात, नागली सारख्या कमी उत्पादन देणाऱ्या पिकांना फाटा देऊन आता इस्रायल पद्धतीने आंबा लागवड करण्याचे तंत्र विकसित करण्यात आदिवासी शेतकऱ्यांना यश आले आहे.पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीसारख्या तालुक्यात अजूनही पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी असल्याने येथील शेतकरी भात नागली सारखे पारंपरिक पिके घेत असतात. मात्र या पिकावरील खर्च व उत्पादनाचा ताळमेळ बसत नसल्याने आदिवासी शेतकरी वर्षानुवर्ष आर्थिक खाईत लोटला जात असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळते. यावर उपाय म्हणून द्राक्ष, डाळींब सारखे पिके घेण्याचे धाडस काही शेतकऱ्यांनी केले. मात्र अधिक पाऊस व प्रतिकूल हवामान यामुळे शेतकऱ्यांनी पिकं हाती येण्याआधीच बागा काढून टाकल्या.
https://www.dailymotion.com/video/x844mgt