ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १८ - कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात सर्वाधिक गु-हाळ घरे आहेत.वडणगे गावातील राजेंद्र व संजय पाटील या बंधुनी पारंपारिक गुळाची निर्मिती न करता चक्की गुळाचे उत्पादन करून एक वेगळीच वाट धरली आहे या गुळाला मागणी असुन दरही नेहमीच्या गुळापेक्षा जास्त मिळत आहे.आज पाटील बंधुची चौथी पिढी या व्यवसायात असुन त्याना असणारे न्यान,बाजार पेठेतील अनुभव व दक्षता यामुळे त्यानी चक्की गुळ निर्मितीत एक वेगळा ठसा उमटवलेला आहे.
नेहमीचा गुळ तयार करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते. तीच पद्धत पण यागुळा साठी धाडस मेहनत ज्ञान व तत्परता महत्त्वाची असुन रस आठवण्यासाठी नियमित गुळा पेक्षा अर्धा ते पाऊण तास जास्त चुलवाण द्यावे लागते.मात्र हे देत असताना गुळव्या व चुलव्या यांच्यात संवाद असावा लागतो.वरुण गुळव्या ने सांगितले प्रमाणे चुलव्या ने जळण घालुन उष्णता द्यावी लागते.अन्यथा आदण काळे पडुन बाद होऊ शकते चक्की गुळाच्या आदणासाठी सुमारे तिन ते साडेतीन तासाचा वेळ लागतो.
या व्यवसायात वेळेला फार महत्त्व आहे. साधारण दोन अडीच तासानंतर वारंवार आदन तपासावे लागते.आदनाची गोळी तयार करुन ती काईलीवर आपटताच 'खट्ट' असा आवाज आला तरच ते आदन तयार झाले अस समजतात.त्यानंतर मात्र काही वेळातच काईल खाली उतरुन त्याची घोटणी केली जाते घोटणी करुण आदानाची तार धरल्यावर आपल्याला हव्या असलेल्या अकारात तो गुळ भरला जातो.ग्राहकांच्या मागणी प्रमाणे १ ते १०किलो पर्यंतची ठेप केली जाते.
चक्की गुळाची निर्मिती करणारे पाटील बंधु हे तालुक्यातील एकमेव आहेत. ते आपल्या गुर्हाळ घरामध्ये हंगामात त्याना दिवसाला ८ ते ९ टन ऊस लागतो.तर संपूर्ण हंगामात ९००टन ऊसा पासुन ९० हजार कीलो चक्की गुळ तयार केला जातो. या गुळाची मागणी पुर्ण हंगामात रहाते. सर्वसाधारण गुळापेक्षा चक्की गुळाला ४०० ते ५०० रु जादा दर मिळतो.
पाटील बंधु पैकी राजेंद्र पाटील हे मोठे भाऊ त्याना चिक्कि गुळातील ज्ञान असल्याने ते गुर्हाळ घरावरच थांबून असतात.तर संजय पाटील हे बाजारात जातात.बाजार समितीत सर्वच शेतकरी विक्रीसाठी जात नाहीत त्यामुळे गुळ कोणत्या भावाने गेला हे समजत नाही तिथे शेतकर्याची फसगत होते.मात्र संजय पाटील हे रोजच्या रोज बाजार समितीत जातात.व व्यापारी मागणी नुसार चक्की गुळ तयार केला जातो.
चक्की गुळ काढणे हे सोपं नाही.डोळ्यात तेल घालून लक्ष द्याव लागते.कुठल्या वेळी कोणते आदन फेल जाईल सांगता येत नाही.दर हंगामात २.३ आदन फेल जातात पण आमचे युवराज सावंत हे गुळवे धाडस करतात आणि त्याच्या मुळेच आम्ही हे धाडस करु शकतो.
- संजय पाटील
काय आहेत उपयोग..
चिरमुरा लाडु व खाजा..
कर्नाटक..
करदंट बर्फी
लोणावळा..
चक्की गुडदाणे.
https://www.dailymotion.com/video/x844olf