ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ६ - महाबळेश्वर येथे विक्रमी पाऊस, जोरदार पावसाने मुंबई तुंबली, पुण्यात पूर अशा बातम्या आणि जोरदार पावसाचे वृत्त आपण पाहतो़ रात्रंदिवस पडणारा हा पाऊस कसा मोजतात़ हे आता आपण पाहुयात़
पुण्यातील कृषी महाविद्यालयात भारतीय हवामान शास्त्र विभागाचा हवामान निरीक्षण विभाग आहे़ स्वित्झर्लंडच्या हवामान विभागाच्या तोडीचा हा विभाग आहे. येथील परिसर जास्तीतजास्त नैसर्गिक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे़ त्यामुळे येथे हवा विनाअडथळा येते. जमिनीची आर्द्रता, बाष्पीभवन यासह पावसाची मोजणी येथे होते़
भारतीय हवामान विभागाचा दिवस सकाळी साडेआठ वाजता सुरु होऊन दुसºया दिवसी सकाळी साडेआठ वाजता संपतो़ या २४ तासांत पडलेल्या एकूण पावसाची आकडेवाडी मोजली जाते. दिवसभरात दर तीन तासांनी आठ वेळा मोजणी होती़ फायबल ग्लास रिअर फोर्स रेंज गेटच्या माध्यमातून ही मोजणी होते़ वरच्या एरियाचा डायमीटर १६ सेंटीमीटरचा असतो़ त्याच्याखाली ४ लिटरची बाटली असते़ दर तीन तासाने यातील पाणी कॅलीबेटर ग्लासमध्ये घेऊन तो पाऊस मोजला जातो़ २० मिमीपेक्षा जास्त पाऊस असेल, तर पहिले पाणी टाकून देऊन त्यात उरलेले पाणी टाकले जाते़ अशाप्रकारे दर तीन तासात किती पाऊस होतो, याचे रेकॉर्ड ठेवले जाते़
पण, या तीन तासात कोणत्यावेळी किती पाऊस झाला त्याचा जोर किती होता, तो कितीवेळ पडला, हे सांगता येत नाही़ त्यासाठी त्या शेजारीच सेल्फ रेकॉर्डिंग रेनगेज मशीन बसविण्यात आले आहे़ त्यावर दररोज सकाळी एक चॉर्ट बसविला जातो़ त्याच्या डॅमला एक रेकॉडिंग पेन जोडलेला असतो़ तो चॉर्टवर टेकवला जातो़ पाणी खाली जाईल, त्या प्रमाणे हा पेन चॉर्टवर त्याचा ग्राफ काढतो़ त्यातून पडलेला पाऊस हा किती वेळ होता, त्याची तीव्रता किती होती़ हे समजते़ १०मिमी पाऊस झाला की त्या डॅममधील सर्व पाणी स्वयंचलितरित्या निघून जाते व पेन पुन्हा खाली येऊन पहिल्यापासून नोंद करण्यास सुरुवात करतो़.