ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 1 - इंडीयन कॅडेट फोर्सची मनीषा जयकृष्ण वाघमारे अशिया खंडातील व जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (८८५० मी/२९०३५) फुट सर करणार आहे. 2 एप्रिलपासून तिची ही मोहिम सुरु होणार आहे. एशियन ऐडव्हेंचर्स या कंपनीद्वारे तिची मोहिमेसाठी निवड झालेली आहे.
मनीषा सध्या डॉ. सौ.इ.भा.पा. महिला महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक या पदावर कार्यरत आहे. मागील १० वर्षापासून तिला गिर्यारोहणाचा अनुभव आहे. यापूर्वी तिने हिमालयातील ७ शिखरे तसेच ऑस्ट्रेलिया यूरोप व आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरे हे व्यक्तिगत खर्चातून सर केलेली आहेत. आज एमजीएम संस्थेतर्फे अंकुशराव कदम यांच्या हस्ते तिला फ्लॅग ऑफ़ करून पुढील मोहिमेस शुभेच्छा देण्यात आल्या.