नाना देवळे, ऑनलाइन लोकमत
मंगरूळपीर (वाशीम), दि. १३ - सोनखास मंगरूळपीर येथील जय बजरंग गणेश मंडळाने कापसापासून मुर्ती साकारून शेतीविषयी व जलसंधारणाचा बोलका देखावा करून शेतक-यांना मार्गदर्शन करण्याचे काम हाती घेतले आहे. बजरंग गणेश मंडळ दरवर्षी नवनवीन देखावा तयार करून नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. यावर्षी या मंडळाने जलसंधारणाचे महत्त्व आपल्या देखाव्यातून स्पष्ट केले आहे. जलसंधारण करण्यापूवी गावाची स्थिती व जलसंधारणनंतरची स्थिती अतिशय सुरेख साकारली आहे. मंगरूळपीर येथील धर्माजी महाकाळ यांनी कापसापासून सुरेख अशी गणेशमूर्ती साकारली आहे.