जळगाव : येथील तनय मल्हारा हा स्टार प्लस वाहिनीवरील ‘डान्स प्लस २’या नृत्यस्पर्धेत विजेता ठरला आहे. अवघ्या १४ वर्षांचा सर्वात कमी वयाचा डान्सिंग आयकॉन होण्याचा मान तनयला मिळाला आहे. वाईल्ड रिपर्स हा ग्रुप उपविजेता तर पीयूष भगत सेकंड रनरअप ठरला. तनयला विजयासाठी जळगावसह साऱ्या खान्देशची समर्थ साथ मिळाली. आॅलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक हिच्या हस्ते त्याला अभिनेता रणबीर कपूरच्या उपस्थितीत २५ लाख रुपयांचे पहिले बक्षिस तसेच कार व इतरही बक्षिसांचा वर्षाव त्याच्यावर झाला.तनयच्या विजयाची माहिती जळगावमध्ये सोशल मीडियाद्वारे पोहोचताच फटाके फोडून आनंद व्यक्त केला. रविवारी स्टारच्या स्टुडिओत झालेल्या ग्रँड फिनालेत प्रेक्षकांचा कौल जाहीर करण्यात येऊन तनयला विजेता घोषित करण्यात आले. दोन जुलैपासून सुरू झालेल्या तनयच्या अभियानाची यशस्वी सांगता झाली. यावेळी तनयचे वडील आनंद मल्हारा, आई नलिनी मल्हारा व कुटुंबीय उपस्थित होते. (प्रतिनिधी)
VIDEO : जळगावचा तनय ठरला ‘डान्स प्लस २’चा बादशाह
By admin | Published: September 26, 2016 3:45 AM