शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

VIDEO - कोकण रेल्वेत चहाबिस्कीट घोटाळा, सतर्क प्रवाशाने केला उघड

By admin | Published: August 26, 2016 6:20 PM

लांब पल्याच्या रेल्वे गाडयांमध्ये चहा विकणाऱ्याकडुन प्रवाशांची होणारी फसवणुक एका प्रवाशाने उघडकीस आणली. इतकेच नव्हे तर लुबाडणाऱ्या रेल्वेच्या कंत्राटदाराला देखील त्याने चांगलाच धडा शिकवीला.

- जनशताब्दी लोकलमधील प्रकार
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: लांब पल्याच्या रेल्वे गाडयांमध्ये चहा विकणाऱ्याकडुन प्रवाशांची होणारी  फसवणुक एका प्रवाशाने उघडकीस आणली. इतकेच नव्हे तर लुबाडणाऱ्या  रेल्वेच्या कंत्राटदाराला देखील त्याने चांगलाच धडा शिकवीला. 
 
दिपक जाधव असे या प्रवाशाचे नाव आहे. ते मुळचे गोरेगावचे रहिवासी असुन ते 'लोकसेवा प्रतिष्ठान' या संस्थेचे अध्यक्ष आहेत. कोकणातील देवगड या त्यांच्या गावी गेलेले जाधव पाच जुलै रोजी कणकवलीहुन मुंबईला जनशताब्दी गाडीने  परतत होते. जवळपास अडीचच्या सुमारास त्यांनी गाडी पकडली. त्याच संध्याकाळी गाडीत चहा विक्रीसाठी येणाऱ्या एका व्यक्तीकडे त्यांनी चहा मागितला. तेव्हा त्या चहाची किंमत त्याने  दहा रुपये असल्याचे सांगितले. त्यामुळे जाधव यांनी त्याच्याकडे मेनुकार्ड मागितले. तेव्हा मेनुकार्ड न दाखवता त्याने चक्क जाधव यांना 'लेने का है तो लो, वरना जाओ', असे उद्धटपणे उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी तुझ्या मेनेजरला बोलव, असे सांगितले. तेव्हाही 'तुम जाकर बुलाकर लाओ', असे उत्तर त्याने जाधव याना दिले. अखेर जाधव यांनी आवाज चढवला, तेव्हा कोणीतरी जाऊन चहा विक्रेत्यांचा मॅनेजर ए के राय जो सनशाईन प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीचा प्रमुख आहे त्याला बोलावुन आणले. तो आल्यानंतर जाधव आणि अन्य प्रवाशांनी रायला घेरले आणि त्याची चांगलीच कानउघडणी केली. मुख्य म्हणजे ज्यांना दहा रुपयाने चहाचा कप विकण्यात आलेला त्या सर्वांना त्यांचे तीन रुपये परत करण्यास सांगण्यात आले. ज्यात वतानुकुलीत डब्यातील प्रवाशांचा देखील समावेश होता. रायला जाधव यांच्यासह अन्य प्रवाशांनी देखील घेरले. त्यानंतर याप्रकरणी  टीसीकडे लेखी तक्रार करण्यात आली. ज्याची प्रत 'लोकमत' कडे आहे. यांच्यावर काय कारवाई करणार असे विचारले असता त्यांना मेमो देण्यात येणार असे उत्तर टीसीकडून देण्यात आले. दर दिवशी लाखो प्रवासी या लोकलने प्रवास करतात. त्यामुळे दिवसभरात गाडीत चहा पिणाऱ्यांची संख्या देखील तितकीच मोठी आहे . त्यानुसार प्रत्येकाकडून जर तीन रुपये विनाकारण आकारले जात असतील तर रेल्वेचे कंत्राटदार महिनाभरात लोकलमधुन किती कोटींची फसवणुक करत असतील याचा नुसता अंदाजच केलेला बरा, ज्याची माहिती खरच रेल्वे प्रशासनाला नसेल का, असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. 
 
'बिस्कीट मिळालेच नाही' !
'आम्ही राय याला अख्या रेल्वेत फिरवले आणि त्याच्या माणसांनी कोणा कोणाला चहा विकला याबाबत विचारणा केली. तेव्हा ज्यांना या लोकांनी चहा विकला त्या प्रत्येकाकडून चहाच्या एका कपासाठी दहा रुपये आकारण्यात आलेले मात्र कोणालाही बिस्कीट चा पूड मिळाला नसल्याचे उघड झाल्याचे जाधव यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले. 
 
प्रत्येक डब्यात रेटकार्ड लावा 
दर दिवशी प्रवाशांची नकळतपणे फसवणुक करणाऱ्या कंत्राट दारांना धडा शिकवायचा असेल तर खाद्य पदार्थाचे रेट कार्ड प्रत्येक डब्यात लावण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. कारण हे कार्ड नेहमी लपविले जाते आणि त्याचा गैरफायदा उठविला जातो. 
 
(जागरूक प्रवासी दीपक जाधव)