- नंदकिशोर नारे
भाष्कराचार्यांच्या सिध्दांतशिरोमणी ग्रंथात उल्लेख!
वाशिम, दि.11 - ऋषिमुनींनी लंकेपासून ते मेरु पर्वतापर्यंत पृथ्वीची मध्यरेषा कल्पीलेली आहे ती वाशिमधून जाते. वाशिममधून जेथून ही मध्यरेषा जाते त्या ठिकाणी सद्यस्थितीत ‘ मध्यमेश्वर’ प्राचिन मंदिर आजही अस्तित्वात आहे. याची कल्पना पुरातन विभागाला असतांनाही याच्या प्रचार, प्रसारासाठी मात्र आजपर्यंत पाठपुरावा करण्यात आला नाही याची खंत नागरिकांत दिसून येत आहे.
प्राचीन मध्यमेश्वर मंदिर आज ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी वाकाटक काळात ‘वेधशाळा’ होती. येथे मंदिराची दुरुस्ती करतांना केलेल्या कामामध्ये वेध शाळेचे काही अवशेषही सापडले आहेत. हे अवशेष जंतर-मंतर वेधशाळेसारखे होते. तिरुपती येथील बालाजींचे दर्शन घेतल्यानंतर वाशिमच्या बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर तिरुपतीच्या बालाजीचे दर्शन सार्थक ठरते अशी आख्यायिका असल्याने अनेक भाविक तिरुपती येथून वाशिम येथील बालासाहेबांच्या दर्शनासाठी येतात. मध्यमेश्वरांचा पाहिजे तसा प्रचार व प्रसार न झाल्याने हे स्थळ न पाहताचं निघून जातात. या संदर्भात जनजागृती होणे आवश्यक आहे