शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
2
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
3
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
4
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
5
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
6
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
7
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
8
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
10
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
11
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
12
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
13
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
14
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
15
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
16
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
17
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
18
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
19
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
20
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?

VIDEO : मराठ्यांचे 'सीमोल्लंघन'! बेळगावात धडकले भगवे वादळ

By admin | Published: February 16, 2017 4:04 PM

संतोष मिठारी, प्रदीप शिंदे, प्रकाश बेळगोजी/ऑनलाइन लोकमत  बेळगाव, दि. 16 -  न्याय-हक्कासाठी आवाज उठवण्याकरिता आम्हाला कोणत्याही सीमांचे बंधन नाही, ...

संतोष मिठारी, प्रदीप शिंदे, प्रकाश बेळगोजी/ऑनलाइन लोकमत बेळगाव, दि. 16 -  न्याय-हक्कासाठी आवाज उठवण्याकरिता आम्हाला कोणत्याही सीमांचे बंधन नाही, हे सकल मराठा समाजाने बेळगावमध्ये ठणकावून सांगत क्रांती मूक मोर्चातून सीमाप्रश्नाच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे गुरुवारी लक्ष वेधले. कर्नाटकातील कानाकोपऱ्यासह महाराष्ट्र, गोवा येथून लाखोंचा जनसागर बेळगावमध्ये धडकला. इतिहासात मराठ्यांच्या पराक्रम पाहिलेल्या या भूमीत मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून वेगळा इतिहास घडविला. प्रशासनाच्या विरोधी भूमिकेमुळे बेळगावमधील या सकल मराठा व मराठी क्रांती मूक मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागले होते. प्रशासनाने मोर्चाच्या आदल्याशिवाय जाचक अटी घालून परवानगी देऊन सुद्धा मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा व मराठी बांधव-भगिनी सहभागी झाल्या. मोर्चात सुमारे दहा लाख मराठा बांधव-भगिनी सहभागी झाल्याचा दावा मोर्चाच्या संयोजकांनी केला. सकाळी आठ वाजल्यापासून बेळगांवमध्ये मराठा बांधव येऊ लागले. काहीवेळातच शहरातील विविध मार्ग गर्दीने फुलून गेले. मोर्चा सुरु होणाऱ्या शिवाजी उद्यान याठिकाणाच्या दिशेने महिला, पुरूष, युवक-युवतींचे जथ्थेच्या जथ्थे येत होते. यातील बहुतांश जणांच्या हातात भगवा ध्वज, विविध मागण्यांचे फलक, डोक्यावर ह्यएक मराठा लाख मराठाह्ण ह्यमी मराठाह्ण असा उल्लेख असलेली भगवी टोपी, गळ्यात स्कार्फ आणि अंगात काळे टी-शर्ट होते. महिलांनी भगव्या साड्या नेसल्या होत्या. सकाळी नऊला शिवाजी उद्यानाचा परिसर गर्दीने खचाखच भरुन गेला. या उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मथुरा कुंडेकर, प्रांजल धामणेकर, सलोनी पाटील, गौतमी उगाडे आणि वैष्णवी कडोलकर या रणरागिणींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन सकाळी साडेदहा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या मार्गावर स्वयंसेवकांनी मानवी साखळी करुन प्रथम युवती, महिला, ज्येष्ठ व्यक्तींना सोडले. त्यापाठोपाठ पुरूष, युवक सहभागी झाले. कोणत्याही घोषणा, जयजयकार न करता लाखोंचा जनसमुदाय मोर्चाच्या आचारसंहितेचे पालन करीत शिस्तीबद्धपणे पुढे सरकत होता. रखरखत्या उन्हाचा तडाखा बसत असताना देखील मोर्चात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढतच होती.मोर्चा मार्गावरील विविध गल्लीमधील महिला-पुरूष या जनसागरात सहभागी होत होते. मोर्चातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मराठी अस्मिता आणि मागण्यांच्या पूर्तता होईपर्यंत लढा देण्याचा पक्का निर्धार स्पष्टपणे दिसत होता. हवेत भिरभिरणारे भगवे ध्वज, डोक्यांवरील टोप्या आदींमुळे अवघ्या शहरात भगवे वादळ निर्माण झाले होते. कपिलेश्वर मंदिर, शिवराय उड्डाणपूल, शनि मंदिर, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, संयुक्त महाराष्ट्र चौक, डॉ. राजेंद्रप्रसाद चौक मार्गे धर्मवीर संभाजीचौकात मोर्चा पोहोचला. याठिकाणी कार्यकर्त्यांनी  निवेदन दिले. यानंतर राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला.मोर्चा संपला, तरी अनेक बांधव, भागिनी शहरात दाखल होत होते. 

 

 

https://www.dailymotion.com/video/x844r6i