ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 22 - छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धपुर्णाकृती पुतळा बसविण्याचा वाद पेटला असून रविवारी शिवसेनेने पुतळा आणून तो पूर्वीच्याच जागी बसविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापटी झाली. अखेर जुन्याच जागेवर शिवसेनेने आणलेला पुतळा बसविण्यात आला.नंदुरबार पालिकेच्या जुन्या इमारतीवर शिवरायांचा अर्धपुर्णाकृती पुतळा होता. पालिकेची इमारत पाडून त्या ठिकाणी व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. त्यामुळे पुतळा आता असलेल्या पालिकेच्या इमारतीत ठेवण्यात आला आहे. तोच पुतळा पूर्वीच्या जागेवरच बसवावा अशी मागणी करीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्याअंतर्गत आज शिवसेनेने आणलेला पुतळा बसविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतल्यावर वाद झाला. शिवसैनिक वाहनासमोर आडवे झाले. अखेर पोलिसांनी पुतळा ताब्यात दिला. तो शिवसैनिकांनी पूर्वीच्या जागेवर बसविल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. पूर्वीचाच पुतळा न बसविल्यास यापुढेही आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.यामुळे काही काळ या भागात तणाव निर्माण झाला होता.
VIDEO- नंदुरबारात पुतळावाद पेटला, शिवसेना आक्रमक
By admin | Published: January 22, 2017 9:01 PM