ऑनलाइन लोकमतमानोरा, दि. 29 - तालुक्यातील मौजे वापटा शेतशिवारात 29 जून रोजी शेतकरी पुत्रांनी नवीन शक्कल लढवत मोटारसायकलने डवरणीचा प्रयोग केला आणि बैलाने डवरणी केल्यापेक्षा मोटरसायकलने कमी खर्चात जास्त शेती डवरणी होत असल्याचे त्यांनी सांगितले.मौजे वापटा येथील शेतकरी दिलीप कृष्णा राठोड यांनी आपली मोटारसायकल शेतमजूर उमेश राठोड व पवन राठोड यांना सोबत घेवुन २९ जुन रोजी शेतात मोटर सायकलने सोयाबीनच्या शेतात डवरणी केली. एका दिवसात मोटार सायकलने ५ एकर शेती डवरणी होते तसेच ४ लिटर मोटर सायकलला पेट्रोल लागत.त्यामुळे मोटर सायकलने केलेली डवरणी कमी खर्चात होते अशी माहिती शेतकऱ्याने दिली. भाड्याने डवरणी पडतेय महागया शेतकऱ्याने जाळे भाड्याने लावुन डवरणी केली असती तर ३०० रुपये एकर प्रमाणे १५०० रुपये मोजावे लागले असते. तसेच मोटर सायकलने ५ एकर डवरणी केली असता चार लिटर पेट्रोलचे ३८० व दोन मजुराचे ४०० असे एकुण ७८० रुपयात डवरणी झाली. कमी खर्चात शेती करणाऱ्या वापटा येथील शेतकरी दिलीप राठोड यांचे कौतुक होत आहे.शेतातील डवरणी करायची पण पुरेसा पैसा नाही, शेतीसाठी मनुष्यबळ शोधायसाठी मोठी कसरत करावी लागते. अशावेळी अचानक कल्पना आली की, मोटारसायकलने डवरणी केल्यास काय हरकत आहे. प्रयत्न करुन पाहिला व त्यात यश आले. सुरुवातीला मजुराच्या ठिकाणी मित्राचा वापर केला व नंतर मजूर सांगितले. -दिलीप राठोड, शेतकरी
VIDEO- वाशीममध्ये वापटा शिवारात मोटारसायकलने डवरणी
By admin | Published: June 29, 2017 7:21 PM
ऑनलाइन लोकमत मानोरा, दि. 29 - तालुक्यातील मौजे वापटा शेतशिवारात 29 जून रोजी शेतकरी पुत्रांनी नवीन शक्कल लढवत मोटारसायकलने ...
https://www.dailymotion.com/video/x8456v8