नाना देवळे / ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 25 - विज पुरवठा नसतानाही रब्बीच्या हंगामात सिंचन करून पिक उत्पादन वाढविण्यासाठी थेट ट्रॅक्टरच्या इंजिनवरच मोटारपंप बसविण्याचा अभिनव प्रयोग मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी रविंद्र लक्ष्मण राऊत यांनी केला आहे.
वनाजा येथील रविंद्र राऊत हे एक प्रगतशील युवा शेतकरी आहेत. आपल्या शेतीत विविध प्रयोग करू न भरघोस उत्पादन ते घेत असतात. मागील तीन वर्षे अवषर्णामुळे त्यांना पाण्याअभावी फारसे उत्पन्न घेणे जमले नाही; परंतु यंदा चांगला पाऊस पडला आणि वातावरणही पोषक असल्यामुळे तयांनी रब्बी हंगामात भाजीपाल्यासह, हरभरा, गहू या पिकांची पेरणी केली आहे.
रविंद्र राऊत यांच्याकडे ३५ एकर अधिक शेती आहे. या शेतीत ते विविध प्रयोग करतात. यंदा मुबलक पाणी असतानाही विजेअभावी नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी नामी शक्कल लढविली आहे. वनोजा परिसरात सोनल प्रकल्पाचा कालवा शेतकºयांसाठी सोडण्यात आला आहे. या कालव्यात सतत पाणी असते कालव्यालगत शेती असलेले आणि विजेची सोय असलेले अनेक शेतकरी त्याचा फायदा घेतात. यामध्ये रविंद्र राऊत यांचाही समावेश आहे; परंतु कालव्यालगतच्या त्यांच्या शेतात विज पुरवठा नसल्याने त्यांना या कालव्यातील पाण्याचा लाभ घेणे कठीण झाले होते.
प्रत्यक्षात कालव्यातील पाण्याचा विजेशिवाय उपयोग घेण्यासाठी डिझेल इंजिन असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करून नेहमीच त्या अवजड इंजिनची उचलखाचल करावी लागणार होती; परंतु या समस्येवर त्यांनी नामी पर्याय शोधला. आपल्या शेतीच्या कामासाठी घेतलेल्या ट्रॅक्टरचा आधार त्यांनी घेतला. शेतीच्या मशागतीसह शेतमालाची नेआण करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करतानाच. या ट्रॅक्टरच्या इंजिनवरच त्यांनी मोटारपंप चालविण्याचा प्रयोग केला. यासाठी त्यांना दिवसाला १० ते १२ लीटर डिझेल लागते आणि त्यासाठी मोठा खर्चही होतो; परंतु हा प्रयोग त्यांच्या उत्पादनात वाढ करीत आहे. कालव्या लगत मोटारपंपसाठी एक स्टॅण्ड तयार करून त्यावर मोटारंपप फिट करीत ट्रॅक्टरच्य इंजिनवर हा मोटारपंप ते चालवितात. पिकांना पाणी देण्याचे काम झाले, की हाच ट्रॅक्टर इतर शेती कामासाठी त्यांना वापरता येतो. क्षमता अधिक आणि फायदा अधिक; परंतु परीश्रम कमी, अशा या प्रयोगाने त्यांना भरघोस उत्पन्न होत आहे.
https://www.dailymotion.com/video/x844mes